90 Years of RBI: 'हा तर फक्त ट्रेलर', मोदींनी सांगितला पुढचा प्लॅन; RBIच्या कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या भाषणातील 10 मुद्दे

90 years of RBI: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 एप्रिल 2024 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. RBI चा गेल्या 90 वर्षातील प्रवासाचा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित करण्यात आला आहे.
PM Modi addresses ceremony marking 90 years of RBI
PM Modi addresses ceremony marking 90 years of RBISakal

90 years of RBI: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 एप्रिल 2024 रोजी 90 व्या वर्षात पदार्पण करत आहे. RBI चा गेल्या 90 वर्षातील प्रवासाचा कार्यक्रम नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे आयोजित करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आहे. (PM Modi addresses ceremony marking 90 years of RBI)

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''आज भारतीय रिझर्व्ह बँकेने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. RBI ला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. RBI ही एक संस्था म्हणून स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाची साक्षीदार आहे.

आज RBI तिच्या व्यावसायिकतेमुळे आणि बांधिलकीमुळे जगभरात ओळखली जाते. RBI च्या स्थापनेला 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.''

नरेंद्र मोदी म्हणाले की, ''सध्या जे आरबीआयशी संबंधित आहेत त्यांना मी खूप भाग्यवान समजतो. आज तुम्ही बनवलेली धोरणे आणि तुम्ही करत असलेले काम RBI च्या पुढील दशकाची दिशा ठरवेल.

हे दशक या संस्थेला शताब्दी वर्षापर्यंत घेऊन जाणारे दशक आहे आणि हे दशक विकसित भारताच्या संकल्प प्रवासासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.''

PM Modi addresses ceremony marking 90 years of RBI
Medicine Price: मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग; कोणत्या औषधांचा समावेश?

''2014 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या '80व्या' वर्षाच्या कार्यक्रमाला मी आलो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. भारतातील संपूर्ण बँकिंग क्षेत्र समस्या आणि आव्हानांना तोंड देत होते.

एनपीएबाबत भारताच्या बँकिंग व्यवस्थेची स्थिरता आणि भवितव्य याबाबत प्रत्येकाच्या मनात भीती होती.''

''आणि आज बघा. आज भारताची बँकिंग प्रणाली जगात एक मजबूत आणि टिकाऊ प्रणाली म्हणून गणली जात आहे. एकेकाळी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेली बँकिंग व्यवस्था आता फायदेशीर बनली आहे.''

''आज देश पाहत आहे - जेव्हा हेतू योग्य असतो तेव्हा धोरण योग्य असते. जेव्हा धोरण योग्य असते तेव्हा निर्णय योग्य असतात. आणि जेव्हा निर्णय योग्य असतात तेव्हा परिणाम योग्य असतात.''

PM Modi addresses ceremony marking 90 years of RBI
RBI Celebrates 90 Years: RBIचा 90वा वर्धापन दिन! पहिले गव्हर्नर सर ऑस्बोर्न स्मिथ ते शक्तिकांता दास, असा आहे प्रवास

''पुढील 10 वर्षांचे लक्ष्य निश्चित करताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे- भारतातील तरुणांच्या आकांक्षा.

भारत आज जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. तरुणांच्या या आकांक्षा पूर्ण करण्यात आरबीआयची महत्त्वाची भूमिका आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com