

PM Mudra Yojana and Stand-Up India Extended Till 2031
esakal
PM Mudra Yojana and Stand-Up India Extended Till 2031 : लघुउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसह महिला आणि नवउद्योजकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) आणि स्टँड-अप इंडिया योजनेला ३१ मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा