पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' सुरू केली. या योजनेअंतर्गत घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश १ कोटी कुटुंबांना फायदा देणे आणि सरकारला दरवर्षी वीज खर्चात ७५,००० कोटी रुपये बचत करण्यास मदत करणे आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोफत वीज. सोलर पॅनल्समुळे तुमचे वीज बिल कमी येईल किंवा बिलच येणार नाही.