
थोडक्यात
पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियाने MCLR दरात 5 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.
RBI च्या रेपो रेट कपातीनंतर बँकांनी कर्ज सस्त करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे कर्जांच्या EMI मध्ये घट होणार असून कर्जदारांना दिलासा मिळेल.
Major Banks Cut Lending Rates: देशातील काही प्रमुख सरकारी बँकांनी कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB), इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियाने आपल्या MCLR दरांमध्ये 5 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. ही कपात जुलै 2025 पासून लागू झाली असून, होम लोन, ऑटो लोन आणि इतर कर्जे घेणाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.