जिद्द असेल तर अपयशसुद्धा शिकवण बनते आणि माणूस पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न सुरू करतो. मनातील जिद्द हीच आपल्या यशाची खरी गुरुकिल्ली असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनोबल खचू न देता जिद्दीने पुढे जाणे महत्त्वाचे आहे. जिद्द असल्यास यश नक्कीच मिळते हे राजस्थानच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रेमचंद गोधा यांनी दाखवून दिले आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रेमचंद गोधा यांचे संगोपन आणि प्रारंभिक शिक्षण सामान्य ग्रामीण वातावरणात झाले. त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीचे शिक्षण घेतले आणि या व्यवसायाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.