Tax Discounting : ‘टॅक्स डिस्काउंटिंग’मुळे ‘एमएसएमईं’ना चालना; पुणे, मुंबईतील सर्वाधिक उद्योगांना लाभ

देशभरातील ३२ हजारांहून अधिक छोटे उद्योग या कंपनीशी जोडले गेले असून, त्यातील २० ते २४ टक्के उद्योग महाराष्ट्रातील आहेत.
promotion of MSME due to Tax Discounting Benefit to most industries in Pune Mumbai
promotion of MSME due to Tax Discounting Benefit to most industries in Pune MumbaiSakal

Pune News : राज्यातील छोट्या उद्योगांनी आपली खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी ‘टॅक्स डिस्काउंटिंग’ सेवेचा लाभ घेण्यात आघाडी घेतली असून, सुमारे सात ते आठ हजारांहून अधिक ‘एमएसएमई’ क्षेत्रातील उद्योग या सुविधेचा लाभ घेत आहेत.

यात मुंबई आणि पुण्यातील उद्योगांचा सर्वाधिक वाटा आहे, अशी माहिती ‘एम वन एक्स्चेंज’ या ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टीम सेवा देणाऱ्या कंपनीचे प्रवर्तक व संचालक संदीप मोहिंद्रू यांनी दिली. 

देशभरातील ३२ हजारांहून अधिक छोटे उद्योग या कंपनीशी जोडले गेले असून, त्यातील २० ते २४ टक्के उद्योग महाराष्ट्रातील आहेत. राज्यसरकारनेही कंपनीशी सामंजस्य करार केला असल्याने राज्य सरकारी उद्योगांचे पुरवठादार असलेल्या छोट्या शहरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनादेखील जलद गतीने पैसे मिळणे शक्य झाले आहे.

खेळते भांडवल नसल्याने व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होत असल्याने या क्षेत्राच्या वाढीला चालना मिळाली आहे. कंपनीने साठहून अधिक बँका, १६०० पेक्षा अधिक मोठे व्यवसायही जोडले असून, त्यांच्या सहकार्याने छोट्या उद्योगांना त्यांनी पुरवलेल्या मालाचे पैसे काही प्रमाणात आधी उपलब्ध करून दिले जातात.

यासाठी ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध असून, एकदा देयकाला मान्यता मिळाली, की २४ तासाच्या आत छोट्या उद्योजकाच्या खात्यात पैसे जमा केले जातात.  याद्वारे कंपनीने सुमारे पाच ते आठ टक्के खर्च वाचवण्यात यश मिळवले असून, त्याचा लाभ उद्योगांना दिला जातो, असे मोहिंद्रू म्हणाले.

‘ईवाय’च्या अहवालानुसार, भारतातील ‘एमएसएमई’ क्षेत्रामध्ये ५३० अब्ज डॉलर भांडवलाची तफावत आहे. देशातील सुमारे साडे सहा कोटी ‘एमएसएमईं’पैकी केवळ १४ टक्के उद्योगांकडे औपचारिक कर्ज सेवा उपलब्ध आहे.  कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मधील २३ हजार कोटी रुपये किमतीच्या तुलनेत २०२४ मध्ये ४३ हजार कोटी रुपये किमतीच्या ‘इनव्हॉइसेस’ची सूट दिली आहे.

एक लाख कोटींचा टप्पा पार 

‘एम वन एक्स्चेंज’ने थ्रूपुट मूल्यामध्ये एक लाख कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. छोट्या  व्यवसायांमध्ये या सुविधेबाबत माहिती आणि स्वीकृती वाढत असल्याने पर्यायी वित्तपुरवठा क्षेत्रातील परिवर्तन घडवण्यातील या प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com