

पुणे : गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेली घसरण, त्याचा म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर झालेला विपरीत परिणाम आणि दुसरीकडे सोन्याच्या भावात झालेली मोठी वाढ या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना विविध प्रश्न भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत नेमके काय करायला हवे, आगामी काळातील गुंतवणुकीचे नियोजन कसे असायला हवे, या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ मनी’ आणि ‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुंतवणूकदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.