

Private Bus Operators Charging Extra Fares During Diwali? Here's Where to Complain
eSakal
Where to complain against overcharging in Pune: दिवाळीसाठी आता पुण्यातून घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने प्रवाशांकडून जास्तीच्या दराची आकारणी करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ताज्या माहितीनुसार, भरारी पथकाने गेल्या काही दिवसांत 250 ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यात 20 ट्रॅव्हल्सचालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.