

Punjab and Haryana High Court imposes a Rs 1 lakh fine and issues a contempt notice to the Punjab Chief Secretary over pending DA and DR arrears of government employees and pensioners
esakal
पंजाब सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या प्रलंबित महागाई भत्त्याचा (DA) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) यांची थकबाकी देण्यास विलंब होत असल्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावत दहा दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.