
Petrol-Diesel Price Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या कच्च्या तेलावरून मोठी धमकी दिली आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने ट्रम्प संतापले आहेत. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमधील रक्तपात थांबवला नाही, तर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 25 ते 50 टक्के सेकंडरी टॅरिफ लादला जाईल.