

आजकाल लोक कमाईचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. पण एक बिजनेसमॅन अनोख्या व्यवसायातून कोट्यावधी रुपये कमवत आहे, त्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. या व्यक्तीला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. ही कहाणी आहे उत्तरप्रदेशातील राधेश अग्रहरी यांची, ज्यांनी टाकाऊ वस्तूव उपयोगात आणून उत्तम प्रोडक्ट्स बनवले आहेत. राधेश हे मेलेल्या कोंबड्यांच्या पिसांपासून प्रोडक्ट्स बनवून विकत आहेत. सोबतच त्यांनी गावातील बेरोजगार महिलांना रोजगार देखील दिला आहे. अवघ्या 16000 रुपयांत सुरु केलेला हा व्यवसाय आता करोडोंच्या घरात पोहचला आहे.