RailOne App Brings New Year Relief with 3% Digital Payment Discount
Sakal
Indian Railways Discount : तुम्हीही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर बातमी तुमच्या फायद्याची आहे. रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकिटांवर सूट देण्याची घोषणा केली आहे. १४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत रेलवन (Rail One) अॅपद्वारे ऑनलाईन तिकिट खरेदी करण्यावर आणि कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास प्रवाशांना ३% सूट मिळेल. सध्या ही सुविधा फक्त आर-वॉलेट वापरून तिकिट बुकिंग केल्यास कॅशबॅक स्वरूपात मिळत होती, पण आता ती सर्व डिजिटल पेमेंट्सवर मिळणार आहे.