Kotak Mahindra Bank: दीपक गुप्ता यांच्याकडे कोटक महिंद्रा बँकेची कमान, RBI ने 2 महिन्यांसाठी केले MD-CEO

Kotak Mahindra Bank: दीपक गुप्ता यांच्याकडे केवळ 2 महिन्यांसाठीच पदभार देण्यात आला आहे.
RBI approves appointment of Dipak Gupta as interim MD & CEO of Kotak Mahindra Bank
RBI approves appointment of Dipak Gupta as interim MD & CEO of Kotak Mahindra BankSakal

Kotak Mahindra Bank: खाजगी क्षेत्रातील चौथी सर्वात मोठी बँक कोटक महिंद्राला नवे CEO मिळाले आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) दीपक गुप्ता यांची बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.

मात्र, ही त्यांची अंतरिम नियुक्ती असून दीपक गुप्ता यांच्याकडे केवळ 2 महिन्यांसाठीच पदभार देण्यात आला आहे. उदय कोटक यांनी 1 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

कोटक महिंद्रा बँकेने शुक्रवारी आपल्या नियामक फाइलिंगमध्ये सांगितले की आरबीआयने दीपक गुप्ता यांची 2 सप्टेंबरपासून 2 महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे, यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी उदय कोटक यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या 4 महिने आधीच MD-CEO पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार होता.

RBI approves appointment of Dipak Gupta as interim MD & CEO of Kotak Mahindra Bank
SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! गृहकर्जावर मिळणार सूट, ऑफर फक्त 'या' तारखेपर्यंत

कोण आहेत दीपक गुप्ता?

दीपक गुप्ता यांना बँकिंग क्षेत्रात मोठा अनुभव आहे आणि ते 1999 पासून उदय कोटक यांचे सहकारी म्हणून कोटक बँकेशी जोडले गेले आहेत. त्यानंतर ते कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक म्हणून रुजू झाले.

कोटकच्या रिटेल व्यवसायाचा विस्तार करण्यात आणि 2003 मध्ये कोटक यांना बँकिंग परवाना मिळवून देण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कोटक ग्रुपमध्ये येण्यापूर्वी दीपक गुप्ता एएफ फर्ग्युसनच्या कन्सल्टन्सी विभागात काम करत होते.

RBI approves appointment of Dipak Gupta as interim MD & CEO of Kotak Mahindra Bank
G20 Summit India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर, 'या' आर्थिक धोरणांवर होऊ शकते चर्चा

दीपक गुप्ता यांच्याकडे बँकेच्या आयटी क्षेत्राच्या जबाबदारीसोबतच सायबर सुरक्षा आणि बिझनेस इंटेलिजेंस सारख्या कामांचीही जबाबदारी गुप्ता यांच्यावर आहे. दीपक गुप्ता यांनी 1983 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअरिंग केले. त्यानंतर 1985 मध्ये त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com