RBI Penalty: धक्कादायक! सायबर हल्ल्यात 'या' बँकेतून 12.48 कोटी गायब, काय आहे प्रकरण?

बँकेवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
RBI
RBI Sakal

RBI Cyber Security Violations: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. सायबर सुरक्षेच्या नियमांबाबत हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, सायबर ऑडिट आणि हैदराबाद पोलिसांच्या तपासात बँकेतील त्रुटी उघड झाल्यानंतर एपी महेश सहकारी बँकेला 65 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी या बँकेत डल्ला मारला होता. जानेवारी 2022 मध्ये, फिशिंग मेलद्वारे सिस्टममधून 12.48 कोटी रुपये काढण्यात आले.

हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर ऑडिट आणि पोलिस तपासात बँकेतील महत्त्वपूर्ण त्रुटी उघड झाल्या, बँकेने सायबर सुरक्षे नियमांकडे दुर्लक्ष केले आहे.

बँकेवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. असे नुकसान टाळण्यासाठी सर्व बँकांनी सायबर सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

एपी महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने सायबर फसवणुकीची घटना नोंदवल्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी सांगितले की फिशिंग ईमेलद्वारे बँक हॅक करुन 12.48 कोटी रुपये काढण्यात आले.

RBI
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

बँकेचा निष्काळजीपणा आला समोर

तपासादरम्यान नायजेरियन नागरिकांसह अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, तपासात बँकेने सायबर सुरक्षा उपाय जसे की अँटी-फिशिंग ऍप्लिकेशन्स सारख्या सायबर सुरक्षेच्या आरबीआयने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी न करण्याबाबत बँकेचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.

हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी आरबीआय गव्हर्नरला पत्र लिहून गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला आणि निलंबनाची विनंती केली. हैदराबाद शहर पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला, ज्यामुळे आरबीआयने एपी महेश सहकारी बँकेला 65 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

RBI
PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com