
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात मोठी कपात करण्याचा विचार करत आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठका पुढील महिन्यातील जूनपासून दिवाळीपर्यंत होणार आहेत. तिन्ही बैठकींमध्ये रेपो रेट कमी केला जाऊ शकतो. काही अहवालांमध्ये असा दावा केला आहे की, ही कपात 0.50 ते 0.75 टक्क्यांपर्यंत असू शकते. जर रेपो दरात अशी कपात झाली तर सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळेल.