

RBI Repo Rate: Will Your EMI Increase in December? SBI Research Predicts a 25 Basis Point Rate Hike
eSakal
SBI Research forecast on RBI repo rate hike: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची (MPC) महत्त्वाची बैठक डिसेंबरमध्ये होणार आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. SBI रिसर्चच्या अहवालानुसार, वाढती महागाई, रुपयाची स्थिती आणि जागतिक आर्थिक घडामोडी लक्षात घेता RBI रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते.
ऑक्टोबरमध्ये RBI ने रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सने वाढवून 5.50 टक्क्यांवर नेला होता. आता डिसेंबरमध्ये तो 5.75 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज SBI रिसर्चने व्यक्त केला आहे. या संभाव्य दरवाढीमागे तीन प्रमुख घटक आहेत.