RBI 2000 Note: 2,000 रुपयांच्या नोटा पोस्ट ऑफिसमधूनही बदलता येणार; आरबीआयने दिली माहिती

RBI 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटले आहे की, पोस्ट ऑफिसमधून 2,000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. 2,000 रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी लोक आरबीआय कार्यालयात रांगा लावत आहेत. RBI वेबसाइटवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हटले आहे की लोक पोस्ट ऑफिसमधून नोट बदलू शकतात.
RBI 2000 Note
RBI 2000 NoteSakal

RBI 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटले आहे की, पोस्ट ऑफिसमधून 2,000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. 2,000 रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी लोक आरबीआय कार्यालयात रांगा लावत आहेत. RBI वेबसाइटवर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये (FAQs) RBI ने म्हटले आहे की, लोक पोस्ट ऑफिसमधून नोट बदलू शकतात.

2000 रुपयांची नोट कशी बदलायची?

आरबीआयने दिलेल्या उत्तरानुसार, लोकांना ऑनलाइन उपलब्ध असलेला अर्ज भरावा लागेल आणि भारतीय पोस्टच्या (आरबीआय जारी केलेल्या) कार्यालयाला पाठवाव्या लागतील. गेल्या वर्षी मे महिन्यात, RBIने 2000 रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्या 2016 मध्ये नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच चलनात आल्या होत्या.

इतक्या नोटा परत आल्या आहेत

मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या 97.38 टक्के नोटा परत आल्या आहेत. बँक काउंटरवर नोटा बदलून किंवा जमा करण्याची परवानगी दिल्यानंतर, आरबीआयने इतर अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत जिथे नोटा बदलल्या किंवा जमा केल्या जाऊ शकतात.

RBI 2000 Note
Budget 2024: निवडणुकीच्या वर्षात दोनदा अर्थसंकल्प का सादर केला जातो? काय आहे कारण?

RBI FAQ नुसार, पोस्ट ऑफिस सेवांसह 19 RBI कार्यालयांमध्ये एक व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंतच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकते.

आरबीआयने असेही म्हटले आहे की, ज्यांच्याकडे फक्त 2-3 नोटा आहेत अशा लहान संख्येच्या चलनी नोटा बदलून घेणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही.

आरबीआयने सर्वसामान्यांना नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती, जी नंतर 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आता सामान्य लोक आरबीआयने सांगितलेल्या प्रादेशिक कार्यालयांमध्येच 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतात.

RBI 2000 Note
Narayana Murthy: सुधा यांना कंपनीबाहेर ठेवणे ही माझी चूकच; नारायण मूर्ती यांची मुलाखतीदरम्यान कबुली

बँक नोटांची देवाणघेवाण करण्यासाठी RBIने 19 कार्यालयांची यादी तयार केली आहे. यात अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरमचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com