
RBI Cash Reserve Ratio: महाकुंभामुळे बँक खाती रिकामी झाली आहेत. हे थोडं विचित्र वाटेल पण महाकुंभला जाण्यासाठी करोडो लोकांनी बँकांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले. आता तर बँकांकडे कर्ज वाटपासाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे.
बँकांची स्थिती सुधारण्यासाठी आरबीआय आता मोठे पाऊल उचलणार आहे. बँकिंग क्षेत्रातील भांडवली तरलता वाढवण्यासाठी आरबीआयला लवकरच काहीतरी करावे लागेल, असे एका अहवालातून समोर आले आहे.