Reliance Jio: 5G शर्यतीत जिओ बादशहा! जिओ बनले जगातील सर्वात मोठे मोबाइल ऑपरेटर, चायनाला टाकले मागे

Reliance Jio: भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, रिलायन्स जिओने डेटा वापराच्या बाबतीत एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या एका तिमाहीत जिओ नेटवर्कवर एकूण 40.9 एक्झाबाइट्स डेटा वापरला गेला
Reliance Jio emerges as World's largest mobile operator in data traffic, surpassing China mobile
Reliance Jio emerges as World's largest mobile operator in data traffic, surpassing China mobile Sakal

Reliance Jio: भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, रिलायन्स जिओने डेटा वापराच्या बाबतीत एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या एका तिमाहीत जिओ नेटवर्कवर एकूण 40.9 एक्झाबाइट्स डेटा वापरला गेला, तर चीनचा चायना मोबाइल 40 एक्झाबाइट्ससह डेटा वापरण्यात दुसऱ्या स्थानावर आहे.

चौथ्या क्रमांकावर एअरटेल

नेटवर्कवरील डेटाचा वापर तिमाहीत 40 एक्झाबाइट्सपेक्षा कमी राहिला. डेटा वापराच्या बाबतीत चीनची आणखी एक कंपनी चायना टेलिकॉम तिसऱ्या स्थानावर आहे, तर भारताची एअरटेल चौथ्या स्थानावर आहे.

जगातील अव्वल दूरसंचार कंपनी

  • रिलायन्स जिओ

  • चायना मोबाईल

  • चायना टेलिकॉम

  • भारती एअरटेल

Reliance Jio emerges as World's largest mobile operator in data traffic, surpassing China mobile
Loan Fraud: देशातील सर्वात मोठ्या फायनान्समध्ये 150 कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

5G नेटवर्कवर 10 कोटी 80 लाख ग्राहक

5G सेवा सुरू केल्यानंतर, रिलायन्स जिओचा डेटा वापर मागील वर्षाच्या तुलनेत 35.2 टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे Jio चे खरे 5G नेटवर्क आणि Jio Air Fiber चा विस्तार. Jio नेटवर्क रिलायन्स जिओच्या तिमाही निकालांनुसार, Jio True 5G नेटवर्कमध्ये 108 दशलक्ष ग्राहक जोडले गेले आहेत आणि Jio च्या एकूण डेटा ट्रॅफिकपैकी सुमारे 28 टक्के डेटा आता 5G नेटवर्कवरून येत आहे.

Reliance Jio emerges as World's largest mobile operator in data traffic, surpassing China mobile
RBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बँकेतील ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत; काय आहे प्रकरण?

2018 मध्ये डेटा ट्रॅफिक फक्त 4.5 एक्साबाइट्स

जिओ एअर फायबरनेही देशभरातील 5,900 शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही निकालांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Jio नेटवर्कवर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर 28.7 GB पर्यंत वाढला आहे, जो तीन वर्षांपूर्वी फक्त 13.3 GB होता. 2018 मध्ये भारतातील एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिक एका तिमाहीत केवळ 4.5 एक्साबाइट्स होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com