
Mukesh Ambani: देशातील आघाडीचे उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 2.9 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 25,000 कोटी रुपये) परदेशी कर्ज घेतले आहे. हे कर्ज या वर्षातील भारतातील सर्वात मोठे परदेशी कर्ज मानले जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे कर्ज 55 बँकांच्या ग्रुपने सिंडिकेटेड स्वरूपात दिले आहे.