Jio Cinema: अंबानींचा मोठा निर्णय! फ्री दिल्यानंतर आता Jio Cinema आकारणार चार्ज, IPL वर...

चित्रपट किंवा टीव्ही मालिका पाहण्यासाठी ग्राहकांना शुल्क भरावे लागेल.
Jio Cinema
Jio CinemaSakal

Jiocinema Subscription Charge: Jio Cinema हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे OTT प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्याकडे इंडियन प्रिमियम लीग (IPL) चे हक्क आहेत. अनेक वर्षांची सबस्क्रिप्शन प्रथा मोडून मुकेश अंबानींनी Jio सिनेमावर IPL मोफत दाखवत आहेत आणि विक्रमी व्ह्यूज मिळवले आहेत.

आता या प्लॅटफॉर्मवर 100 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिका जोडण्याचीही योजना आहे, जेणेकरून वॉल्ट डिस्ने आणि नेटफ्लिक्ससारख्या OTT प्लॅटफॉर्मला स्पर्धा देता येईल.

ब्लूमबर्गच्या अहवालात, रिलायन्सच्या मीडिया आणि व्यवसायाच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की जिओ सिनेमाच्या विस्तारानंतर पैसे आकारले जातील. (Reliance’s JioCinema said to start charging for content by the end of IPL)

किंमतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी लवकरच याबाबत निर्णय होईल. पुढील महिन्यात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट संपण्यापूर्वी नवीन टायटल सादर केले जातील आणि तोपर्यंत प्रेक्षक विनामूल्य सामने पाहू शकतील, असे त्या म्हणाल्या.

चित्रपटांसाठीही पैसे मोजावे लागतील :

IPL नंतर Jio सिनेमावर सबस्क्रिप्शन चार्ज लागू केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, चित्रपट किंवा टीव्ही मालिका पाहण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. किती शुल्क आकारले जाईल, याचा विचार जिओ सिनेमा करत आहे.

Jio Cinema
Mehul Choksi: फरार मेहुल चोक्सीने न्यायालयीन लढाई जिंकली; भारतात आणणे झाले अवघड

जागतिक व्यासपीठ तयार करण्याची तयारी :

मुकेश अंबानी हे व्यासपीठ जागतिक मीडिया आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग जायंट बनण्यासाठी तयार करत आहेत. हे पाहता, गेल्या वर्षी Viacom18 Media Pvt ने IPL चे डिजिटल अधिकार विकत घेतले.

यानंतर अंबानींनी ते विनामूल्य दाखवण्याची ऑफर दिली, जी कोणत्याही मीडिया कंपनीसाठी लोकांना आकर्षित करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतात प्रचंड संभाव्य प्रेक्षक आहेत. JioCinema ने एप्रिलमध्ये IPL च्या सुरूवातीला 1.47 अब्ज पेक्षा जास्त व्हिडिओ दृश्ये आणि बुधवारी एका सामन्यासाठी 22 दशलक्ष प्रेक्षक मिळवले.

Jio Cinema
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com