Reserve Bank of India closely watching high attrition at some private banks says RBI Governor Shaktikanta Das
Reserve Bank of India closely watching high attrition at some private banks says RBI Governor Shaktikanta Das Sakal

RBI Governor: खाजगी बँकांमधील नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणात झाली वाढ; RBIने व्यक्त केली चिंता

Bank Employees Attrition Rate: नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांहून अधिक झाले आहे.

Bank Employees Attrition Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, काही खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढत आहे आणि मध्यवर्ती बँक यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. बिझनेस स्टँडर्डच्या एका कार्यक्रमात शक्तिकांता दास यांनी ही माहिती दिली आहे.

अलीकडच्या काळात खासगी क्षेत्रातील बँकांमधील नोकऱ्या सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. विक्री उद्दिष्टे, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची वाईट वागणूक, जास्त कामाचे तास आणि पदोन्नतीमध्ये होणारा विलंब यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सोडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आणि ही समस्या बँक कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात जास्त दिसून येत आहे.

काही प्रमुख बँकांनी माहिती दिली की नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यांहून अधिक झाले आहे. या आकडेवारीवर भाष्य करताना दास म्हणाले की अशा समस्यांना तोंड देण्यासाठी प्रत्येक बँकेला एक कोर टीम तयार करावी लागेल. नोकऱ्या बदलण्याबाबत तरुणांचा दृष्टिकोन बदलत असून तरुण आता वेगळा विचार करू लागले आहेत, असेही ते म्हणाले.

Reserve Bank of India closely watching high attrition at some private banks says RBI Governor Shaktikanta Das
IT Hiring: आयटी क्षेत्र मंदीच्या छायेत? 25 वर्षांत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत झाली घसरण

यासोबतच शक्तीकांत दास म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग कायम असून दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे सर्वांनाच चकित करतील. यासह ते म्हणाले की, भू-राजकीय अनिश्चितता हा जागतिक विकासासाठी सर्वात मोठा धोका आहे, परंतु संभाव्य समस्यांना तोंड देण्यासाठी भारत चांगल्या स्थितीत आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की क्रिप्टो हा आर्थिक स्थिरतेसाठी गंभीर धोका आहे, विशेषत: उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांसाठी एक नवीन प्रकारचे आव्हान आहे.

Reserve Bank of India closely watching high attrition at some private banks says RBI Governor Shaktikanta Das
Rahul Gandhi: 'मोदींचा आत्मा अदानींच्या हातात' अ‍ॅपल अलर्टचे थेट कनेक्शन...; राहुल गांधींचा मोठा आरोप

डॉलर विरुद्ध रुपया वाद

शक्तीकांत दास म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एका चलनावर अवलंबून राहण्याचे धोके आहेत. हा डॉलर विरुद्ध रुपया वाद नाही. परंतु आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपयाची स्वीकृती वाढविण्याचा विचार करत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com