करखात्याच्या नोटीशीला वेळेत उत्तर द्या!

नोटीशीला १५ दिवसांच्या आत उत्तर देणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा भरलेले विवरणपत्र बाद होण्याची शक्यता असते.
Respond to tax notices in time 15 days income tax website finance\
Respond to tax notices in time 15 days income tax website financesakal
Updated on

- अॅड. सुकृत देव

प्राप्तिकर विवरणपत्र आर्थिक वर्ष २०२३-२४ (आकारणी वर्ष २०२४-२५) चुकीचे भरले असल्यास प्राप्तिकर विभागाकडून कलम १३९(९) नुसार, सदोष (डिफेक्टिव्ह) विवरणपत्र नोटीस, प्राप्तिकरदात्याच्या ई-मेलवर येते किंवा प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर (www.incometax.gov.in) लॉग-इन केल्यास (पेंडिंग ॲक्शन्स <वर्कलिस्ट<नोटीस), प्राप्तिकरदात्याच्या खात्यावर अशी नोटीस दिसते.

अशा नोटीशीला १५ दिवसांच्या आत उत्तर देणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा भरलेले विवरणपत्र बाद होण्याची शक्यता असते. सदोष (डिफेक्टिव्ह) प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याबद्दल आलेल्या नोटीशीला व इतर प्राप्तिकर नोटीशींनादेखील उत्तर देणे बंधनकारक आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • सदोष (डिफेक्टिव्ह) नोटीशीला १५ दिवसांत उत्तर नाही दिले, तर विवरणपत्र बाद केले जाऊ शकते; तसेच करविभाग एक्स पार्टी ॲसेसमेंट (करदाता हजर नसताना केलेली आकारणी), व्याज, दंड आदी कारवाई करू शकतो.

  • करदात्याला सदोष (डिफेक्टिव्ह) विवरणपत्र भरल्याबद्दल दंडात्मक कारवाई नको असल्यास, प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून ऑर्डर करून घेणे हिताचे आहे. या ऑर्डरसाठी सर्व पुरावे, माहिती आदी याची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • चुकीचे विवरणपत्र दाखल केले असल्यास, सुधारित विवरणपत्र कलम १३९(५) नुसार दाखल करणे सोयीचे आहे. हा पर्याय या नोटीशीला उत्तर देताना निवडता येतो.

  • नोटीशीत नमूद केलेला विवरणपत्रातील दोष (डिफेक्ट) बरोबर आहे, की चूक, हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. बरोबर असल्यास देय रक्कम किंवा पुढील कारवाई होऊ शकते आणि चूक असल्यास, का ते नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी करदात्याकडे सर्व पुरावे, माहिती असणे आवश्यक आहे.

  • आजकाल प्राप्तिकर विभागाकडूनच सदोष (डिफेक्टिव्ह) रिटर्न नोटीशीला काय उत्तर द्यावे, याचीही माहिती दिली जाते. यासाठी ‘एफएक्यू’ (FAQ) उपयुक्त ठरेल.

  • ज्या उत्पन्नाच्या स्रोताखाली, उत्पन्न दाखविले आहे, त्याची पडताळणी आवश्यक आहे.

थोडक्यात, प्राप्तिकरदात्यांनी, प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या कोणत्याही नोटीशीकडे दुर्लक्ष करू नये आणि दिलेल्या मुदतीच्या आतच त्यावर कृती करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com