
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे राजकारणानंतर पुन्हा एकदा त्यांच्या कामात व्यस्त झाले आहेत. आता ते अमेरिकन गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्स ग्रुप या कंपनीशी जोडले गेले आहेत. कंपनीत त्यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेविड सोलोमन यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली.