
Rupee Crashes to All-Time Low: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. आज एक डॉलर 88 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. रुपयाचा हा आतापर्यंतचा नीचांक आहे. रुपयाच्या घसरणीमुळे देशात महागाई वाढू शकते. येत्या काही दिवसांत विजेपासून ते पेट्रोल, डिझेल, एलईडी टीव्ही, सोलर पॅनल आदी सर्व काही महाग होऊ शकते. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.