
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) होम लोनवरचा व्याजदर वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे.
बँकेने व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची वाढ केली असून आता दर 7.50% ते 8.70% दरम्यान असतील.
या निर्णयाचा थेट परिणाम नवीन होम लोन घेणाऱ्यांच्या ईएमआयवर होणार आहे.
SBI Hikes Home Loan Interest: घराचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो ग्राहकांना देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठा धक्का दिला आहे. एसबीआयने होम लोनवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे घर खरेदी अधिक महाग होणार आहे.