
सुधाकर कुलकर्णी- सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
सायबर गुन्हेगार डीपफेक, इम्पर्सोनेशन पद्धतीने आपण अधिकृत शेअर ब्रोकर, म्युच्युअल फंड वितरक किंवा गुंतवणूक सल्लागार असल्याचे भासवून शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत असल्याचे आढळून आल्याने यावर उपाय म्हणून नुकतेच म्हणजे ११ जून २०२५ रोजी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने ‘सेबी चेक’ या सुरक्षित पेमेंट प्रणालीची घोषणा केली आहे. भांडवली बाजारातील सर्व मध्यस्थांना एक ऑक्टोबर २०२५ पासून याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.