Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

Share Market Closing : आज सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारून ७५,५०२.८५ वर आणि निफ्टी २५८ अंकांनी २३,४०८.८० वर बंद झाला.
Share Market Closing

Share Market Closing

eSakal 

Updated on

सोमवार १६ मार्च २०२६ रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी उभारी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांतील पडझडीनंतर आज बाजाराने जोरदार कमबॅक केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३८.९३ अंकांनी वधारून ७५,५०२.८५ वर बंद झाला तर नॅशनल शेअर बाजाराचा निफ्टी २५७.७० अंकांच्या वाढीसह २३,४०८.८० च्या वर स्थिरावला. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असूनही भारतीय गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बाजार आज 'हिरव्या' रंगात न्हाऊन निघाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com