

Gold Rate Today: Gold Prices Fall Again in India; MCX Gold and Silver See Sharp Decline
eSakal
Gold Price Today: गेल्या आठवड्यात सलग 5 दिवस मोठी घसरण झाल्यानंतर आठवड्याच्या शेवटी मोठी भाववाढ झाली होती मात्र आज पुन्हा भारतातील सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक सोने बाजारातही मोठे चढ-उतार बघायला मिळतं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.