
share market
esakal
मागील आठवडा शेअर बाजारासाठी अत्यंत यशस्वी ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर्सच्या सेंसेक्समधील टॉप-१० पैकी आठ मूल्यवान कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलपर्यंत आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ते इन्फोसिस (Infosys) यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात १.९४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. यामध्ये टीसीएसच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला, ज्यांनी अवघ्या पाच व्यावसायिक दिवसांत ४५,००० कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला.