Cartrade Tech : कारट्रेड टेकच्या शेअर्समध्ये एका आठवड्यात 32% वाढ, गोल्डमन सॅक्स प्रमुख शेअरहोल्डर...

कारट्रेड टेकच्या (Cartrade Tech) शेअर्समध्ये सध्या चांगली ऍक्शन पाहायला मिळत आहे. नुकतीच या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून मजबूत तेजी दिसली.
Cartrade Tech
Cartrade TechSakal

Cartrade Tech : कारट्रेड टेकच्या (Cartrade Tech) शेअर्समध्ये सध्या चांगली ऍक्शन पाहायला मिळत आहे. नुकतीच या शेअरमध्ये 11 टक्क्यांहून मजबूत तेजी दिसली. सध्या हा शेअर 11.08 टक्क्यांच्या वाढीसह 943.05 रुपयांवर व्यवहार करत आहे. यासह, शेअरने इंट्राडेमध्ये 974 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला.

गेल्या एका आठवड्यातच ई-कॉमर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वास्तविक, गोल्डमन सॅक्सने कंपनीतील आपला हिस्सा वाढवला आहे. गोल्डमन सॅक्सने कंपनीचे अतिरिक्त 106,116 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारातून विकत घेतले आहेत. डिसेंबर 2021 पासून हा शेअर सर्वोच्च पातळीवर आहे.

गोल्डमन सॅक्स ऍसेट मॅनेजमेंट बीव्हीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये सांगितले की 3 मे 2024 पर्यंत आमचा हिस्सा 24.2 लाख शेअर्सपर्यंत वाढला आहे, जो कारट्रेडच्या कॅपिटलच्या 5.16 टक्के आहे. अशा प्रकारे आम्ही आता कंपनीचे प्रमुख शेअरहोल्डर असल्याचे ते म्हणाले. अधिग्रहणापूर्वी, गोल्डमन सॅक्स ॲसेट मॅनेजमेंट बीव्हीकडे कारट्रेडमध्ये विविध योजनांद्वारे 4.93 टक्के हिस्सा होता.

कारट्रेड एक मल्टी-चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सर्व वाहन प्रकार आणि व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेज आहेत. प्लॅटफॉर्मला आर्थिक वर्ष 2024 मध्ये 7 कोटी सरासरी मंथली यूनिक विझिटर्स मिळाले आहेत. हा प्लॅटफॉर्म अनेक ब्रँड्स अंतर्गत कार्यरत आहे,

जसे की कारवाले, कारट्रेड, ओएलएक्स इंडिया, श्रीराम ऑटोमॉल, बाइकवाले, कारट्रेड एक्सचेंज आणि ॲड्रोइट ऑटो. हे प्लॅटफॉर्म नवीन आणि युझ्ड ऑटोमोबाइल कस्टमर्स, व्हेहिकल डीलरशिप, व्हेहिकल ओइएम आणि इतर व्यवसायांना साध्या आणि कार्यक्षम पद्धतीने वाहने खरेदी आणि विक्री करण्यास सक्षम करतात.

कारट्रेडने मार्च तिमाहीत (Q4FY24) 161 कोटीची आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कमाई नोंदवली आहे, जी वार्षिक तुलनेत 38 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचा करानंतरचा नफा (PAT) वार्षिक आधारावर 43 टक्क्यांनी वाढून 25 कोटी झाला आहे. या कालावधीत ओएलएक्स इंडियाच्या अधिग्रहणामुळे कंपनीची लीडरशीप मजबूत झाल्याचे मॅनेजमेंटने सांगितले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com