Mahindra Holidays and resort india ltd : महिन्द्रा हॉलिडेजच्या शेअर्समध्ये एका वर्षात 42% पेक्षा जास्त परतावा, नेट प्रॉफीटमध्येही वाढ...

मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 47.7 टक्क्यांनी वाढून 83.2 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 56.3 कोटी होते.
Mahindra Holidays & Resorts India Share Price
Mahindra Holidays & Resorts India Share PriceSakal

Mahindra Holidays and resort india ltd : महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडने (Mahindra Holidays and resort india ltd ) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या निकालात मोठी वाढ दिसून आली आहे.

यासह मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 47.7 टक्क्यांनी वाढून 83.2 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ते 56.3 कोटी होते.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफीट 116.05 कोटी होता असे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले. मागील आर्थिक वर्षात ते 113.82 कोटी होते. जानेवारी-मार्च तिमाहीत, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्सचे 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत उत्पन्न 830.34 कोटी होते जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 735.26 कोटी होते.

समीक्षाधीन तिमाहीत तिचा एकूण खर्च वाढून 720.86 कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी जानेवारी-मार्च कालावधीत 658.23 कोटी होता. गेल्या वर्षभरापासून कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

एनएसईवर नुकतीच या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. स्टॉकमध्ये ही वाढ 6.45 रुपयांची (1.51%) होती. यासोबतच एका महिन्यात स्टॉकने 11 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एनएसईवर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 470 रुपये आहे आणि त्याची 52 आठवड्यांचा नीचांक 281.55 रुपये आहे.

गेल्या 6 महिन्यांत शेअरमध्ये खूप चढ-उतार दिसून आले. स्टॉकने 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 6.5% परतावा दिला आहे. यासोबतच, या वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 12% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com