Shakti Pumps : शक्ती पंप्सच्या शेअर्समध्ये सलग पाचव्या दिवशी अप्पर सर्किट...

शक्ती पंप्सच्या शेअर्सने सोमवारी 6 मे रोजी सलग पाचव्या दिवशी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले.
Shakti Pumps
Shakti PumpsSakal

शक्ती पंप्सच्या शेअर्सने सोमवारी 6 मे रोजी सलग पाचव्या दिवशी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले. अशात हा शेअर बीएसईवर 2285.85 रुपयांवर पोहोचला. कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीत (Q4FY24) उत्कृष्ट निकाल जारी केले आहेत.

यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सोमवारी शेअरने 2285 या सार्वकालिक उच्चांकावर (All Time high) पोहोचला. चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून त्यात 28 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या तेजीसह कंपनीचे मार्केट कॅप 4,579 कोटी झाले आहे.

शक्ती पंप्सचा नफा-करानंतरचा (पीएटी) जानेवारी-मार्च तिमाहीत 40 पटीने वाढून 89.7 कोटीवर गेला आहे. कंपनीचा महसूलही वर्षभरात 233 टक्क्यांनी वाढून 600 कोटी झाला आहे, तर EBITDA मार्जिन 1,550 बेस पॉइंट्सने वाढून Q4FY24 मध्ये 21.5 टक्क्यांवर पोहोचले आहे. पीएम - कुसुम योजनेंतर्गत FY28 पर्यंत 35 लाखांहून अधिक सौर पंप बसवले जाण्याचा अंदाज आहे. सौर पंप बसवण्यासाठी सरासरी 3 लाख रुपये खर्च येतो.

शक्ती पंप सोलर ही स्टेनलेस स्टील सबमर्सिबल पंप, प्रेशर बूस्टर पंप, कंट्रोलर्स, इन्व्हर्टर आणि इतर उत्पादने बनवणारी एक आघाडीची कंपनी आहे. ही एकमेव कंपनी आहे जी इन-हाऊस सोलर पंप इन्स्टॉलेशनसाठी ड्राईव्ह, स्ट्रक्चर्स, मोटर्स आणि इनव्हेंटर्ससह उत्पादने तयार करते. पण या वर्षी स्मॉलकॅप कंपनीचा शेअर आतापर्यंत 124 टक्क्यांनी घसरला आहे.

गेल्या एका महिन्यात शक्ती पंप्सच्या शेअर्सने 58 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स गेल्या 6 महिन्यांत 118 टक्क्यांनी घसरले आहेत. या वर्षी आतापर्यंत शेअर 121 टक्क्यांनी वाढला आहे.

त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याने 440 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या 4 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 1427 टक्के बंपर नफा मिळाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com