
Silver Prices Hit Record High: चांदीच्या भावाने आज नवीन विक्रम केला आहे. एमसीएक्सवरही मोठी वाढ झाली आहे, किंमत प्रति किलो 1,04,947 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 12 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
कॉमेक्सवर चांदी प्रति औंस 34.87 डॉलरवर व्यवहार करत आहे. ऑगस्ट 2012 नंतरचा हा उच्चांक आहे. चांदीची वाढती मागणी, जागतिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा वाढता रस हे वाढीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.