
Silver Market Shocked as Indian Demand Surges Prices Crash by Rs 7000 in a Day After 45 Years
Esakal
दिवाळी आधी भारतात चांदी व्यावसायिकांना तेजीची अपेक्षा होती. भारतानेच जगभरात चांदी बाजारात खळबळ उडवून दिलीय. भारताने रेकॉर्ड ब्रेक खरेदी केल्यानं फक्त देशांतर्गतच नव्हे तर जागतिक बाजारातही भूकंप आला आहे. चांदीचे दर ५४ डॉलर प्रती औंस इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. यानंतर एकाच दिवसात ६.७ टक्के घसरण नोंदवण्यात आली. गेल्या ४५ वर्षानंतरचं हे सर्वात मोठं संकट मानलं जात आहे. रविवारी चांदीच्या दरात तब्बल ७ हजारांची घसरण झाली. चांदीचा २५ हजारांवर पोहोचलेला प्रिमियम शून्यावर आला आहे.