
Silver Price Today: देशभरात चांदीच्या भावाने आज नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. चेन्नईत चांदीचा भाव थेट ₹ 2 लाख प्रति किलोच्या पुढे गेला असून, एका दिवसात भावात तब्बल ₹ 10,000 ची वाढ झाली आहे. दिल्लीत चांदीचा भाव ₹ 1,90,000 प्रति किलोवर स्थिरावला आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मागणीबरोबरच आंतरराष्ट्रीय कारणांमुळेही चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ दिसत आहे.