
SIP चा 12+12+20 फॉर्म्युला म्हणजे दरमहा ₹12,000 गुंतवा, 12% परतावा मिळवा आणि 20 वर्षं गुंतवणूक चालू ठेवा.
या नियमानुसार 20 वर्षांनी तुमच्याकडे 1.10 कोटींपेक्षा जास्त फंड तयार होऊ शकतो.
कंपाऊंडिंगच्या ताकदीमुळे छोटी गुंतवणूकही दीर्घकाळात मोठी संपत्ती बनवू शकते.
12+12+20 Formula: नियमित उत्पन्नातून थोडीफार रक्कम गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा उत्तम पर्याय आहे. गुंतवणूकदारांमध्ये सध्या 12+12+20 फॉर्म्युला खूप लोकप्रिय होत आहे. हा फॉर्म्युला दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग मानला जातो.