Vehicle Sales : प्रवासी वाहनविक्रीत अल्प वाढ; लोकसभा निवडणुकांमुळे परिणाम

सार्वत्रिक निवडणुकांमुळे देशातील प्रवासी वाहनांची मागणी मे महिन्यात कमी झाल्याने घाऊक विक्रीत वार्षिक तुलनेत अल्प वाढ झाली आहे.
Vehicle Sales
Vehicle Salessakal

नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणुकांमुळे देशातील प्रवासी वाहनांची मागणी मे महिन्यात कमी झाल्याने घाऊक विक्रीत वार्षिक तुलनेत अल्प वाढ झाली आहे. कंपन्यांकडून वितरकांकडे एकूण तीन लाख ५० हजार २५७ प्रवासी वाहने पाठविण्यात आली. मागील वर्षी याच महिन्यात ती तीन लाख ३५ हजार ४३६ होती. त्या तुलनेत मे २०२४ मध्ये चार टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

मारुती सुझुकी इंडियाने मे महिन्यात विक्रीत वार्षिक तुलनेत अल्प वाढ नोंदवली आहे. मे महिन्यात एकूण देशांतर्गत बाजारपेठेत एक लाख ४४ हजार दोनप्रवासी वाहनांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी मे महिन्यात ती एक लाख ४३ हजार ७०८ होती. कंपनीच्या एंट्री लेव्हल आणि कॉम्पॅक्ट कारच्या विक्रीत घट झाली आहे. ब्रिझा, ग्रँड विटारा, एर्टिगा, एस-क्रॉस आणि ‘एक्सएल ६’ यासह युटिलिटी वाहनांची विक्री वाढली असून, मे २०२३ मधील ४६,२४३ मोटारींच्या तुलनेत ती ५४,२०४ पर्यंत वाढली आहे. कंपनी छोट्या मोटारींच्या श्रेणीला चालना देण्यासाठी अल्टो के १०, एस-प्रेसो,सेलेरिओ यांची मर्यादित नवी आवृत्ती सादर करणार आहे, कंपनीच्या विपणन आणि विक्री विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले.

ह्युंदाईने मे २०२३ मधील ४८,६०१ मोटारींच्या तुलनेत मे महिन्यात ४९,१५१ वाहनांची विक्री केली आहे. टाटा मोटर्सने देशांतर्गत बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक दोन टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. मे २०२३ मधील ४५,९८४ मोटारींच्या तुलनेत मे २०२४ मध्ये कंपनीने ४७.०७५ मोटारींची विक्री केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने मे २०२३ मधील ३२,८८६ मोटारींच्या तुलनेत मे २०२४ मध्ये ४३,२१८ मोटारींची विक्री केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात एकूण घाऊक विक्रीत २४ टक्के वाढ नोंदवली आहे. किआ इंडियाची मे महिन्यातील एकूण घाऊक विक्री वार्षिक चार टक्क्यांनी वाढून १९,५०० वर गेली आहे. एमजी मोटर इंडियाने मे २०२३ मधील ५००६ मोटारींच्या तुलनेत पाच टक्के घसरण नोंदवली असून, मे २००४ मध्ये ४७६९ मोटारींची विक्री केली अाहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com