

Success Story: Man Quits ₹1.5 Lakh Mumbai Job, Claims to Earn ₹4 Lakh a Month After Moving Home
eSakal
Investment News Strategy: मुंबईसारख्या मेट्रो शहरात नोकरी आणि तीही 1.5 लाख रुपये महिन्याच्या पगार असेल तर ती गोष्ट मोठी मानली जाते. मात्र, एका आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्याने तब्बल 1.5 लाख मासिक पगाराची नोकरी सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आणि आता तो महिन्याला सुमारे 4 लाख कमावत असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दाव्यामुळे इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेकांनी त्याचे कौतुक केले तर काहींनी या आर्थिक गणितावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.