

Supreme Court Ruling on Gold Possession
esakal
घरात सोने बाळगण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. विवाहित महिलेला ५०० ग्रॅम, अविवाहित महिलेला २५० ग्रॅम आणि पुरुषाला १०० ग्रॅम सोने बाळगण्याची सवलत असली, तरी या सोन्याचा स्रोत स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केवळ निर्धारित मर्यादेत सोने आहे म्हणून त्याच्या स्रोताबाबत स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी संपत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा