
Survey Reveals Corruption In Business: भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे सरकार दावे करत असूनही कंपन्यांना त्यांची कामे करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत आहे. देशभरातील 159 जिल्ह्यांतील सुमारे 66% व्यावसायिक कंपन्यांनी गेल्या 12 महिन्यांत लाच दिल्याचे मान्य केले आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म लोकल सर्कलने रविवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.