
स्विगीने फेस्टिव सीजनच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म फी 12 रुपयांवरून 14 रुपये केली आहे.
दररोज 20 लाखांहून अधिक ऑर्डरमुळे कंपनीला प्रचंड अतिरिक्त महसूल मिळणार आहे.
ग्राहकांना ही वाढ खिशावरचा थेट भार वाटत असून फी कमी होईल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
Swiggy Platform Fee: सणासुदीचा हंगाम सुरू होताच ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी (Swiggy) कंपनीने ग्राहकांना थेट धक्का दिला आहे. आता घरबसल्या जेवण मागवताना आधीपेक्षा जास्त प्लॅटफॉर्म फी द्यावी लागणार आहे. कंपनीने प्रत्येक ऑर्डरवर आकारली जाणारी फी 12 रुपयांवरून 14 रुपये केली आहे. ऐकायला ही वाढ फक्त 2 रुपयांची असली तरी रोज कोट्यवधी ऑर्डर करणाऱ्या कंपनीसाठी हा निर्णय प्रचंड नफा मिळवून देणारा ठरणार आहे.