Taj Hotel
Taj HotelSakal

Taj Hotel: टाटांच्या ताज हॉटेलने रचला इतिहास; भारतातील बनली नंबर वन कंपनी, किती आहे मार्केट कॅप?

Taj Hotel: टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलबद्दल तुम्हाला माहिती असेलच. या समूहाचे पहिले हॉटेल 1903 मध्ये मुंबईत सुरू झाले. एका खोलीचे रात्रीचे भाडे 6 रुपये होते. ताज हॉटेल चालवणारी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) चे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Published on

या मार्केट कॅपला स्पर्श करणारी ही पहिली भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी ठरली आहे. या क्षेत्रातील ओबेरॉय हॉटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ओबेरॉय हॉटेल्सची मूळ कंपनी EIH चे मार्केट कॅप सुमारे 24,000 कोटी रुपये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com