
Tata Partnership with Tesla: टाटा ऑटोकॉम्प, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्या इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीच्या जागतिक पुरवठादार बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुपने अमेरिकन इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टेस्लासोबत जागतिक पुरवठादार म्हणून भागीदारी केली आहे.
एकीकडे, टेस्ला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे, टाटा टेस्लासाठी स्थानिक पुरवठादार म्हणून काम करण्यास तयार आहे.