
Trump Tariff Impact Tata Motors: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी शुल्क दराची घोषणा केली. या धक्क्यामुळे वाहन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत. ह्युंदाई आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांना याचा फटका बसला आहे. त्यांचे शेअर्स अडीच टक्क्यांनी घसरले आहेत. अमेरिकेबाहेर बनवलेल्या वाहनांवर 25 टक्के शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.