Tata Sons Chairman: टाटा सन्सच्या चेअरमनची झाली पगारवाढ, आकडा ऐकून व्हाल थक्क!

Tata Sons Chairman Chandrasekharan Salary: चंद्रशेखरन यांची TCS मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले.
Tata Sons Chairman Chandrasekharan Salary
Tata Sons Chairman Chandrasekharan SalarySakal

Tata Sons chairman Chandrasekharan Salary: टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) मध्ये 113 कोटी रुपये मोबदला म्हणून मिळाले आहेत. 60 वर्षीय चंद्रशेखरन यांना कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 109 कोटी रुपये मानधन दिले होते.

चंद्रशेखरन यांना 2019 मध्ये 65 कोटींचे मानधन मिळाले. टाटा सन्सने आपल्या वार्षिक अहवालात याबाबत खुलासा केला आहे. कंपनीने टाटा सन्सचे कार्यकारी संचालक सौरभ अग्रवाल यांना 27.82 कोटी रुपयांचे मानधन दिले.

एन चंद्रशेखरन यांची पहिली नोकरी TCS मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून होती आणि तेव्हापासून त्यांनी टाटा समूह सोडला नाही. 2009 मध्ये त्यांना TCS चे CEO बनवण्यात आले.

2016 मध्ये, एन चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. 2017 मध्ये ते टाटा सन्सचे चेअरमन झाले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली.

Tata Sons Chairman Chandrasekharan Salary
UPI Lite: इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने UPI Lite बाबत घेतला मोठा निर्णय, फक्त...

वेणू श्रीनिवासन यांनी पगार घेतला नाही

वेणू श्रीनिवासन, ज्यांची 2016 मध्ये बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी 2023 च्या आर्थिक वर्षात टाटा सन्सकडून पगार म्हणून एकही रुपया घेतला नाही. वेणू श्रीनिवासन यापूर्वी TVS चे चेअरमन होते.

टाटा सन्समध्ये बिगर कार्यकारी संचालक म्हणून पिरामल समूहाचे मालक अजय पिरामल यांना कंपनीने 2.8 कोटी रुपये दिले आहेत.

त्याच वेळी, टाटा सन्सच्या इतर संचालकांमध्ये, विजय सिंग, हरीश मनवानी, लिओ पुरी, भास्कर भट्ट आणि राल्फ स्पेथ यांना कमिशन म्हणून FY23 साठी 2.8 कोटी रुपये पगार देण्यात आला आहे. जुलै 2022 मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त झालेल्या अनिता जॉर्ज यांना 2.1 कोटी रुपये पगार देण्यात आला.

Tata Sons Chairman Chandrasekharan Salary
UPI Lite: इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने UPI Lite बाबत घेतला मोठा निर्णय, फक्त...

टाटा सन्सचा महसूल वाढला

आर्थिक वर्ष 2023 मध्ये टाटा सन्सने 35,058 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंपनीचा नफा 22,132 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये कंपनीने 24,132 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता, तर नफा 17,171 कोटी रुपये होता.

टाटा कन्सल्टन्सीने टाटा सन्सला सर्वाधिक लाभांश दिला. त्याच वेळी, टाटा सन्सचा तोटा जो 2022 मध्ये 27,516 कोटी रुपये होता, तो 2023 मध्ये 20,642 कोटी रुपयांवर आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com