
GST Notice To Tata Steel: देशातील एक नामांकित आणि विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखली जाणारी टाटा स्टील सध्या अडचणीत सापडली आहे. कंपनीला कर विभागाने 1,007 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस पाठवली आहे.
या प्रकरणामुळे टाटा स्टीलच्या कार्यपद्धतीवर आणि वित्तीय धोरणांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, या नोटीशीमुळे त्यांच्या रोजच्या कामकाजावर किंवा कमाईवर कोणताही परिणाम होणार नाही.