

Tax Refund in Just 7 Days! But Missing This Step Could Delay Your Money
eSakal
Income Tax Refund: देशभरातील आयकर भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण याआधी ज्या आयकर रिफंडचे (Tax Refund) जे पैसे बँक खात्यात जमा होण्यासाठी करदात्यांना अनेक महिने वाट पहावी लागायची, ते पैसे आता अवघ्या 7 ते 10 दिवसांत जमा होत आहे. आयकर विभागाने आयकराबाबतची आपली पडताळणी यंत्रणा वेगवान केल्याने हा बदल झाला आहे. मात्र जर तुमच्या अर्जात काही तांत्रिक चुका किंवा तफावत असेल तर हा रिफंड मिळायला तब्बल 4 ते 5 आठवड्यांचा वेळ लागू शकतो.