
Tata Consultancy Services: वांशिक भेदभावाच्या आरोपांनंतर अमेरिकेच्या समान रोजगार संधी आयोगाने (EEOC) भारतातील सर्वात मोठ्या आयटी आउटसोर्सिंग कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) विरुद्ध चौकशी सुरू केली आहे. अमेरिकन कर्मचाऱ्यांनी कंपनीवर वय आणि वंश या आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.