
भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), पुढील वर्षात आपल्या कर्मचारी संख्येत सुमारे २ टक्क्यांनी कपात करणार आहे. यामुळे सुमारे १२,२०० कर्मचाऱ्यांवर, विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के. कृतिवासन यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही कपात कंपनीला "अधिक चपळ आणि भविष्यासाठी सज्ज" बनवण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहे.